मिशन काश्मीरने राज्यसभा जिंकली, लोकसभा सहज शक्य,,, विधेयक यशाच्या दिशेने...

जम्मू-काश्मीर राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करणारे ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. १२५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर ६१ जणांनी विरोधात मतदान केले. सर्व राज्यसभा सदस्यांनी चिठ्ठीद्वारे मतदानाचा हक्क बजावला. 

सरकारकडे राज्यसभेत पूर्ण बहुमत नाही पण तिहेरी तलाकप्रमाणे मोदी सरकारने जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक आणि जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०१९ राज्यसभेत मंजूर करण्यात यश मिळवले. लोकसभेत पूर्ण बहुमत आहे यामुळे तेथे हे सहज मंजूर होईल.

 

Review