मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून सांगली जिल्ह्य़ातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या चार तालुक्यांना आणि सांगली शहर तसेच सातारा जिल्हय़ातील सातारा, कराड, पाटण, वाई या तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे.


मुख्यमंत्री सकाळी विशेष विमानाने प्रथम सांगलीकडे रवाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी सोबत महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत.

Review