महाराष्ट्र पुरात बुडत असताना भाजप नेते निवडणुकीच्या प्रचारात गुंग... सांगलीचा पालकमंत्री पुण्यात करतोय भाजपच्या संघटनात्मक बैठका

सत्तेपुढे शहाणपण खोटे असते पण सत्तेपुढे जीवित आणि वित्तहानी सुद्धा काहीच नाही, सांगली पाण्यात बुडत असताना तेथील पालकमंत्री  सुभाष देशमुख मात्र पुण्यात पक्षांच्या बैठका घेत आहेत. 

मतदारांबरोबर संपर्क कसा ठेवायचा याबद्दल बूथकेंद्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाशय पुण्यात आले होते. 
डीपी रस्त्यावरील एका कार्यालयात ही बैठक झाली. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

यांनी या बैठकीत खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, पुण्यातील भाजपाचे सहाही आमदार, शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, महापौर मुक्ता टिळक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे आदी यावेळी उपस्थित होते.

Review