महाराष्ट्र राज्यात ८९८ विज्ञान केंद्रची  स्थापना.

पुणे - शालेय जीवनात विज्ञानाची  खोलवर माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या  प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.याअंतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्य़ांतील निवडक शाळांमध्ये मिळून ८९८ विज्ञान केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालिका वंदना कृष्णा यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, महापालिकांचे शिक्षणप्रमुख, पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक मराठी, उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्युत व्यवस्था, पटसंख्या आदी निकषांनुसार नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यासाठी शाळांची निवड केली जाणार आहे. त्यासाठीचे साहित्य राज्य स्तरावरून खासगी पुरवठादाराकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
 नागपूर मध्ये ५४ विज्ञान केंद्रे,अमरावती आणि चंद्रपूरमध्ये ४५, पुण्यात ४०, बुलढाण्यात ३९, कोल्हापूर ३८, नगरमध्ये ३०, बीड २४, जळगाव ३२, नांदेड ३४, नाशिक ३६, रायगड ३०, रत्नागिरी १८, सिंधुदुर्ग १६, ठाणे २४, यवतमाळ ३२, मुंबई २४ अशी एकूण ८९८ विज्ञान केंद्र निर्माण केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Review