उद्या काश्मीरप्रमाणे महाराष्ट्राची स्थिती होईल - राज ठाकरे
आज काश्मीर आहे, उद्या विदर्भ आणि मुंबई असेल. उद्या तुमच्या घराबाहेर बंदूक घेऊन उभे असतील. महाराष्ट्रात इंटरनेट, टीव्ही, मोबाइल बंद केले जातील. महाराष्ट्राचे लचके तोडले जातील. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नसून इतर राज्यांसाठीही लागू आहे”, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी सांगितलं की, “भाजपामधील एक वरिष्ठ व्यक्ती पाच सहा जणांशी बोलत होती. उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष हे एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार. कारण त्यांच्याकडे मशीन्स नाही आहेत. कोण बोललं, कधी बोललं हे बाळा नांदगावकर यांना माहिती आहे”.
युएपीए या कायद्याची भारताला गरजच नाही, उलट त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असल्याची भीती यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली. “माहितीचा अधिकार कायद्यात निवडणुकांनंतर बदल करण्यात आला असून सर्व सूत्रं केंद्राच्या हाती आहेत. केंद्र म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.