गणेश मित्र मंडळाच्या वतीने शेकडो पूरग्रस्त कुटुंबांना मदत

भोसरी (सह्याद्री बुलेटिन ) - सदगुरूनगर येथील  गणेश मित्र मंडळाच्या वतीने आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्त 100 कुटुंबांना 10 दिवस पुरेल एवढा संपुर्ण किराणा व जनावरांसाठी 350 पेंढी कडबा तसेच लहान मुलांना कपडे व महिलांसाठी साड्या या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर तालुक्यातील  बहे - बोरगाव,कोल्हापूर शहराजवळ जाधववाडी व कागल तालुक्यातील वंदुर या ठिकाणी मंडळाचे सर्व युवा सहकारी व अध्यक्ष खंडूशेठ मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत घरोघरी जाऊन पोहोचवली. 

या कार्यासाठी अॅड.तुषार रेटवडे, अक्षय एरंडे, सचिन चव्हाण, वैभव टाव्हरे, शुभम वाडेकर, सौरभ वाडेकर, सागर मांदळे, विशाल लबडे, तेजस रेटवडे,ऋषीकेश पवार, सागर एरंडे, अक्षय लवंगे, मंगेश टेमगिरे, अवधुत पवार,अदिनाथ खानदेशे,अवधुत जरे,माऊली पांचाळ यांनी सहभाग घेतला.

Review