अडीचशे नोंदणी कृत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी

(सह्याद्री बुलेटिन ) - महाराष्ट्र शासन , अटल बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अंतर्गत , बांधकाम कामगार सेने मार्फत प्राईड पार्क , प्राईड आयव्हरी या बांधकाम प्रकल्पावर २५० नोंदणी कृत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या वेळी बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे, सचिन गुंजाळ 
तसेच आरोग्य तपासणी टिम व बांधकाम प्रकल्प अधिकारी उपस्तीत होते.
या मध्ये ई सी जी , रक्त , लघवी , हिमोग्लोबीन , ब्लड प्रेशर आदि प्रकारची तपासनी करुन आजारी कामगारांची महात्मा फुले आरोग्य योजना अंतर्गत पुढील उपचारा साठी वाय सी एम , स्टार , डि व्हाय पाटील , लोकमान्य , सह्याद्री हे सर्व हाॅस्पीटल मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. 

Review