कोल्हापूर पुरग्रस्थांसाठी सविता खुळे यांचे गो-दान - करवीरनगरीच्या मदतीला उद्योगनगरी पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका
कोल्हापूर जिल्ह्यातील "प्रयाग चिखली" गावातील पूरग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांना सहकार्य व्हावे यासाठी नगरसेविका सविता नरेश खुळे यांच्या वतीने गो-दान करण्यात आले. हा कार्यक्रम करवीर तालुक्यातील "प्रयाग चिखली" गावात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पार पडला.
या वेळी नगरसेविका खुळे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, सरपंच उमाताई पाटील, साबळेवाडीचे सरपंच तानाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रंगप्पा मोहिते तसेच नारायण खामकर, बाळकृष्ण गायकवाड, हनुमंत कुर्डे, दादा चौघुले, शाम गोडांबे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते
"प्रयाग चिखली" गावाचे पुराणे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सुमारे एक हजार जनावरे वाहून गेली, यामुळे शेतकरी देशोधडीला लागला, यातून सावरण्याचे बळ मिळावे यासाठी १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या गाईंना नगरसेविका सविता नरेश खुळे यांनी दान केले आहे.