विविध विकास कामांसाठी सुमारे ५५ कोटी रूपये खर्चास स्थायी समितीची मंजुरी

पिंपरी (सह्याद्री बुलेटीन): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चापेकर शिल्पसमुह, मोरया मंदीर ते थेरगाव आदी परिसर सुशोभीकरणासाठी येणाऱ्या सुमारे ७ कोटी ९५ लाख खर्चासह विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ५५ कोटी २३ लाख रूपये खर्चास 
स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ही बैठक स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली यावेळी  स्थायी समितीच्या सदस्यांसह अध्यक्ष
विलास मडीगेरी ही उपस्तित होते.
पिंपरी चिंचवडचा ऐतिहासिक ठेवा असलेले  चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चापेकर शिल्पसमुह, मोरया मंदीर परिसर सुशोभीत करून महानगरपालिका या ऐतिहासिक स्थळांना जनताभिमुख बनवण्याचा प्रयत्न करत आहे .

Review