तांत्रिक बिघाडी नंतर इंद्रायणी एक्सप्रेस पुण्याला रवाना
पुणे - मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली होती. मात्र नवीन इंजिन जोडण्यात आल्यानंतर सुमारे तासाभराच्या खोळंब्यानंतर रेल्वे सुरू झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानंतर लोकल गाड्यांची सेवा ऐन गर्दीच्या वेळेत कोलमडली होती.धाव पाळीच्या काळात इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले.
अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांमध्ये या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला होता. त्यामुळे अंबरनाथहून कर्जतला जाणारी लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच अप दिशेच्या वाहतुकीलाही फटका बसला होता. पण आता इंद्रायणी एक्स्प्रेस मार्गी लागली असल्याने हळूहळू मध्ये रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येत आहे.