दिव्यांगांना रोजगाराची सुवर्ण संधी -दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज चा उपक्रम
भोसरी (सह्याद्री बुलेटिन न्युज पोर्टल) : "दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज" च्या वतीने प्रत्येक दिव्यांगांना रोजगार व त्यांच्या द्वारे बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे अशी माहिती कार्यकारी संचालिका राजेश्री गागरे ,समाजसेवक ,मानवी हक्कं संरक्षण व जागृतीचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष, धनराज सिंग चौधरी आणि समन्वयक ब्रम्हानंद कोरपे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे
समाजातील विविध क्षेत्रातील दिव्यांगांना रोजगार उपललब्ध करून देणे, तसेच दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनांना देश विदेशात बाजारपेठ उपलब्ध करणे, आर्थिक आधार देऊन स्वावलंबी बनवणे, व्यावसायिक भागीदार करून घेणे,या व अशा उपक्रमाद्वारे दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सामाजिक अभिसरण करण्याचा प्रयत्न "दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज" करत आहे.