नगरसेविका निता पाडाळे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

काळेवाडी (सह्याद्री बुलेटिन ) : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाने काळेवाडी परिसरात नगरसेविका निता पाडाळे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन मंत्री महादेव जानकर, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप,आयुक्त श्रवण हर्डीकर, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेविका सुनीता तापकीर, नगरसेविका सविता खुळे, नगरसेविका निर्मला कुटे, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, स्वीकृत सदस्य देविदास पाटील आदी मान्यवर, नागरिक आणि महिला उपस्तित होत्या.

नगरसेविका निता पाडाळे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन 

काळेवाडी येथील स्वप्ननगरी, महाराष्ट्र, इंडियन कॉलनी, प्रेमलोक कॉलनी, सहयोग कॉलनी, शांती कॉलनी विजयनगर येतील नवीन पाण्याची लाईन व.भारतमाता चौक ते विष्णुराज, मंगल कार्यालय रस्त्यावर व मातृछाया ,सूर्यकिरण,चंद्रकिरण,  एकता,समता,श्रद्धा,साईराज, अश्विनी,गजराज 1,2  येथील नवीन ड्रेनज पाईप लाईनच्या कामाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.

नगरसेविका निता पाडाळे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन 

काळेवाडी परिसरात मोठ्याप्रमाणात पाण्याची समस्या जाणवत होती, यासाठी स्थानिक नगरसेविका म्हणून मी समस्या सोडविण्याचे अथक प्रयत्न केले. यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्याच मार्गदर्शनाने हि विकासकामे शक्य झाली, अशी कृतज्ञता नगरसेविका निता पाडाळे यांनी व्यक्त केली आहे. 

Review