पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाची  बंदी असलेल्या प्लास्टिक बाबत धडक कार्यवाही - सुमारे दोन लाख रुपयांचा दंड वसूल

 सलग दहा दिवस हि कारवाई चालू ठेवण्यात येणार
सह्याद्री बुलेटिन : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ड क्षेत्रीय कार्यालय मधील कोकणे चौक व आजूबाजूच्या परिसरामधील बंदी असलेल्या प्लास्टिक बाबत महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली, त्यामध्ये एकून २६ दुकानावर कारवाई करण्यात आली. एकूण  १ लाख ३० हजार दंड गोळा करण्यात आला. 


सदरची कारवाई आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोफने,  सहाय्यक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे, संजय कुलकर्णी, राजेश भाट, गणेश देशपांडे , महादेव शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक राजु बेद, अभिजीत गुमास्ते तसेच आरोग्य निरीक्षक विजय दवाळे ,चंद्रकांत रोकडे, शांताराम माने, सुरेश चन्नाल, शेखर निंबाळकर, सतीश इंगेवाड , राजू साबळे ,सुधीर वाघमारे, अंकुश झिटे, एस पी घाटे, उद्धव डवरी, रश्मी तूडलवार, वैभव कंचनगौडार तसेच आरोग्य कर्मचारी स्वदेश साळुंके ,प्रशांत पवार ,राहुल जाधव ,अरुण राऊत ,अरुण वाल्मिकी, गणेश बाबर, सुधाकर मसुरे, आप्पा तोरणे ,चंद्रकांत लवळे, संतोष पवार, विकास शिंदे, वाहनचालक हनुमंत सुरवसे व चंद्रसेन बोराटे तसेच नवनाथ केदारी ,प्रभाकर निकाळजे ,शक्ती लखन, कुणाल कांबळे, दिलीप नाईकनवरे यांनी केली.

या व्यतिरिक्त फ प्रभागा अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ निगडी येथे बंदी असलेल्या प्लास्टिक वापरणाऱ्या पाच व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

सदर कारवाई मुख्य आरोग्य निरीक्षक गायकवाड, आरोग्य निरीक्षक महेश आढाव, वैभव घोळवे, सतीश पाटील व आरोग्य कर्मचारी रामचंद्र शिंगाडे ,दत्तात्रेय घोडके, यांच्या पथकामार्फत करण्यात आली.


तसेच ब क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक उमेश कांबळे यांनी चार व्यावसायिकांवर कारवाई करून वीस हजार रुपये दंड वसूल केला तसेच अ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत  पिंपरी  येथील  आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले यांनी  पाच व्यावसायिकां वर कारवाई करून पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला असे एकूण ४० व्यावसायिकांवर कारवाई करून २,००,००० रुपये दंड वसूल करण्यात आला असून सदरची कारवाई यापुढे दहा दिवस सलग चालू ठेवण्यात येणार आहे

 

Review