पालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेचे आंदोलन

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) : कोणत्याही नगरसेवकाला किंवा जनतेला विश्वासात न घेता पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने कचऱ्यासाठीचा ६० रुपये अतिरिक्त कर जनतेवर लावला आहे, या विरोधात शहर मनसेच्या वतीने आयुक्त कक्षासमोर आंदोलन करण्यात आले. 

या वेळी नगरसेवक सचिन चिखले, उपशहराध्यक्ष चंद्रकांत दानवले, विशाल मानकरी, राजू सावळे, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, सीमा बेलापूरकर, रुपेश पटेकर, सुरेश सकट, अंकुश तापकीर, नारायण पाठारे, अक्षय करंडे, देवेंद्र निकम, रवी जाधव, संदीप राजगुरू, सुरज पात्रे, विशाल मानकरी, हेमंत डांगे, किशोर तेलंगी आदी मान्यवर उपस्तित होते. 

पालिकेने कचरा उचलण्याचे ठेके वोरा आणि बीव्हीजी याना दिले, पण तरीही कचऱ्याची समस्या सुटत नाही, आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय, असे असताना पुन्हा पालिकेने प्रत्येक घरटी ६० रुपये अतिरिक्त कर संकलन सुरु केले आहे, म्हणजे जनतेला वार्षिक ७२० रुपये नाहक दंड द्यावा लागणार आहे. या विरोधात सत्ताधारी आणि आयुक्त यांच्या निषेधार्थ मनसेने आंदोलन केले आहे, अशी माहिती नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली आहे.

Review