शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढाई -राजू शेट्टी

पुणे (सह्याद्री बुलेटिन) :आजपर्यंत शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढलो यापुढे शेतकरी ज्या घटकांवर अवलंबून आहेत अशा बाराबलुतेदार व अठरा  आलुतेदार भटकी विमुक्त जनजाती समाज बांधवांनासाठीचा लढा उभारणार असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे आयोजित प्रजा लोकशाही परिषदेत ते बोलत होते

यावेळी ओबीसी नेते तथा बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, गोर बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, प्रतापराव गुरव,सतिष कसबे,दत्तात्रय चेचर,चंद्रकांत गवळी,साहेबरावजी कुमावत,सतिष दरेकर सदाशिव हिवलेकर,शामराव कुंभार,आनंदा कुदळे, सिध्दार्थ बनसोडे,डाॅ.पी.बी.कुंभार,शशिकांत आमणे,दिनानाथ वाघमारे,पोपळघट,पी.टी.चव्हाण,सुनिल काळे,अविनाश चव्हाण,ए.के.भोई,चंद्रकांत शिंदे,तुकाराम माने आदी मान्यवर उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, मी सत्ताधारी भाजप पक्षा बरोबर काम केले पण हे सरकार पूर्णता शेतकरी, कष्टकरी (बाराबलुतेदार) यांच्या विरोधात आहे,गरीब हा गरीबच राहीला पाहीजे आणि पुन्हा गुलामगिरी करणारा  हिंदुस्तान झाला पाहिजेन असे बेजबाबदारपणे सरकार कार्य करीत आहे .राजकारण करत असताना जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्ययाचे काम हे सरकार करत आहे .

Review