पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे...
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - भाजपच्या माई ढोरे यांची पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी निवड झाली असून त्या सातव्या महिला महापौर ठरल्या आहेत.
चमत्काराची अपेक्षा असलेल्या राष्ट्रवादीच्या पदरी मात्र निराशा पडली आहे, माई ढोरे यांना ८१ मते पडली तर राष्ट्रवादीच्या माई काटे यांना ४० मते पडली.
पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी कामकाज पाहिले.