लिंगायत ही जात नाही तर सामाजिक व्यवस्था - सतीश कसबे

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन) -  बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जातीव्यवस्थेला छेद देऊन सामाजिक एकता निर्माण केली, यामुळे लिंगायत ही जात नसून ती जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन फकीरा दलाचे प्रदेशाध्यक्ष सतीश कसबे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड लिंगायत समाजाच्या वतीने लिंगायत एकता समाज मेळाव्याचे महात्मा बसवेश्वर भवन प्राधिकरण निगडी येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला डॉ. एस बी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष राज पाटील, अशोक नगरकर, लिंगायत माळी समाज संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब वाले, धोंडीराम माळी, बसवराज कनजे, रमेश कोरे आदी उपस्थित होते.

कसबे म्हणाले, विचारवंत आणि चिकित्सक माणसं केवळ विचार करण्यावरच वेळ घालवतात, अशा सुशिक्षित लोकांनी केवळ विचारांवर वेळ न घालवता किंवा स्वतःच्या कौटुंबिक कल्याणाचा विचार न करता, समाजाला डोळ्यासमोर ठेवून जर कार्य केलं तर तो बसवेश्वरांच्या विचारांचा सन्मान असेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज कनजे, सूत्रसंचालन सुनिता नगरकर यांनी केले तर आभार डॉक्टर अशोक नगरकर यांनी मानले.

Review