पाकिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट; १२८ जण ठार

 पाकिस्तानमध्ये शुक्रवारी (दि. १३) दोन ठिकाणी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये १२८ जणांचा मृत्यू झाला. तर तब्बल १८० हून अधिकजन जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका जेष्ठ नेत्याचाही समावेश आहे. पहिला हल्ला बलूचिस्तानातील मसटुंग परिसरात झाला. यामध्ये १२० जण ठार झाले. तर २०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. बलूचिस्तान आवामी पार्टीचे नेते सिराज यांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे.

तर दुसरा हल्ला उत्तर पश्चिम पाकिस्तानातील एका जमियत उलेमा-ए-इस्लाम या धार्मिक पक्षाच्या रॅली दरम्यान केला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांताचे माजी मुख्यमंत्री अकरम दुरानी थोडक्यात बचावले आहेत. येथील हल्यात देखील पाच लोकांचा मृत्यू झाला असून ३७ जण जखमी आहेत. बॉम्ब एका दुचाकीला लावण्यात आला होता. दुचाकी अकरम यांच्या वाहनाजवळ पोहचली असता हा स्फोट झाला.

यापुर्वी १० जुलै रोजी पेशावर येथील निवडणूक रॅलीवर झालेल्या बॉम्बहल्यात आवामी नॅशनल पार्टीचे ज्येष्ठ नेते हारून बिलौर यांच्यासह १९ जण ठार झाले होते.  

Review