सभागृह बाहेर विरोधी पण सभागृहात मात्र मोदी मोदी...
मोदी सरकारविरोधात आज लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे.यावेळी शिवसेना तटस्थ भूमिका घेणार आहे,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना सभागृहात हजर न राहता तटस्थ राहण्याचा आदेश दिला आहे. पण शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत सभागृहात अविश्वास प्रस्तावावर पक्षाची बाजू मांडणार आहेत.
अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. याला काँग्रेससह बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
लोकसभेत भाजपचे बहुमत अगदी काठावरचे आहे. पण विरोधकांची हि केविलवाणी खेळी आहे. गेली चार वर्ष तेलगू देसम भाजप बरोबर होता. त्या वेळी विश्वास होता पण निवडणुकीची चाहूल लागताच अविश्वास निर्माण झाला कसा.
या ठरावामुळे काही राजकीय हालचाली होतात कि पेल्यातील वादळाप्रमाणे हे वादळ शमते हे लवकरच कळेल.