जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेला नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात...

           कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेले संगमनेरचे काँग्रेस नगरसेवक गजेंद्र बजाबा अभंग यांच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री गस्त घालत असताना यांच्याकडे जुन्या नोटांच्या बॅग सापडल्या.ही कारवाई रविवार पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळ करण्यात आली.

            गजेंद्र अभंग (वय 47), विजय शिंदे (वय 38), सुरज जगताप (वय 40), आदित्य चव्हाण (वय 25 ), नवनाथ भांडागाळे (वय 28) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

             वरील सर्व आरोपी बंदिवान मंदिराजवळ रविवार पेठ येथे आले असता गस्तीवर असलेल्या पोलिसांना शंका आली त्यामुळे खडक पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे जुन्या नोटांच्या बॅग सापडल्या. यामध्ये 1000 रुपयांच्या 11 हजार 900 नोटा आणि 500 रुपयांच्या 36 हजार नोटा आढळून आल्या.
पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

Review