द्रायणीनगर परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविले
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंद्रायणीनगर,प्रभाग क्र. ८ मधील परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम जेटपँचप मशीनच्या साह्याने करण्यात आले. महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून खड्डेमुक्त प्रभागासाठी भाजप शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, माजी स्थायी समिती अध्यक्षा सिमाताई सावळे यांनी पाठपुरावा केला.
महापालिकेचे अधिकारी घुबे, वायकर, माने यांच्या सुचनेनुसार प्रभागात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. रस्त्यावरील खड्डे बुजविल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.