पंढरपूरला जाण्यासाठी उद्यापासून पुणे रेल्वे स्थानकावरून विशेष गाडी

आषाढी एकादशीनिमित्त 21 ते 25 जुलै या कालवधीत रेल्वे स्थानकावरून  पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्यरेल्वेच्या पुणे विभागाकडून देण्यात आली आहे. ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 6.15 वाजता सुटणार आहे. ही गाडी मध्यरेल्वेच्या हडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरली, यवत, केडगाव, पाटस, दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब या स्थानकावर थांबेल. भाविकांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यरेल्वेकडून करण्यात आला आहे. 
 
गाडी क्रमांक 01487 सकाळी 6.15 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुपारी 1 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. परत येण्यासाठी गाडी क्रमांक 01488 दुपारी तीन वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि रात्री 8.35 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाड्यातील सर्व डबे हे सामान्य श्रेणीतील असतील, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Review