मेधा पाटकर
महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक नाव म्हणजे मेधा पाटकर. त्या मागील 30 वर्षांपासून महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील विस्तापित लोकांच्या हक्काची लढाई लढत आहेत. या तीन राज्यांसह केंद्र सरकार आणि जागतिक बँकचे अधिकारी त्यांना डोकेदुखी मानतात. त्यांचे नाव उच्चारताच अनेक अधिकाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. आपल्या आंदोलनादरम्यान त्यांनी अनेक अधिकाऱ्यांवर पळ काढण्याची वेळ आणली. आज मेधा यांचा 61 वा वाढदिवस. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे त्यांच्या विषयी खास माहिती...
शेतकरी किंवा आदिवासी नाहीत
मेधा पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन हे समीकरण संपूर्ण देशाला माहित आहे. मात्र, कायम आदिवासी, खेड्यातील नागरिक, शेतकरी यांच्यासोबत दिसून येणाऱ्या मेधाताई शेतकरी, आदिवासी नाहीत. मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. याच शहरात त्यांचे बालपण गेले. त्यांनी टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसमधून सामाज कार्यात पीजीचे शिक्षण घेतले. नंतर याच ठिकाणी त्यांनी काही काळ अध्यापक म्हणूनही सेवा दिली.

जेव्हा मेधाताई फाडफाड इंग्रजी बोलायला लागल्या...
साधी साडी, पायत साधी चप्पल असा पेहरावात मेधाताई दिसतात. त्यामुळे पाहताच क्षणी त्या अल्प शिक्षित आहे, असे कुणालाही वाटते. एकदा शेकडो आदिवासींना घेऊन त्यांनी नर्मदा विकास घाटीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी तिथे कार्यरत असलेल्या एका नव्या अधिकाऱ्याने बाहेर येत मोठ-मोठ्याने इंग्रजीतून त्यांच्यावर आरडा-ओरडा केला. त्याला वाटले की, यामुळे आंदोलक घाबरून जातील. मात्र, उलटलच झाले. त्याचे बोलणे संपताच मेधाताईंनीही फाडफाड इंग्रजीतून सलग 10 मिनीट त्याला नियम समजावून सांगितले. ते पाहून अधिकारी घामाघूम झाला आणि आपल्या कक्षात गेला.