
पवना धारण ९०.६५ टक्के भरले
पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविण्या-या पवना धरणात 90.65 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आजमितीला धरणात 90.65 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रात 62 मिमी पाऊस पडला आहे. 1 जूनपासून पवना धरण क्षेत्रात 2030 मिमी पाऊस झाला आहे. आजमितीला धरणात 90.65 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
दरम्यान, गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत पवना धरण परिसरात 1920 मिमी पाऊस झाला होता. धरण 100 टक्के भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी सांगितले.