भाजपा आणि आरएसएस प्रमाणे सर्व सामान्य लोकात जाऊन कार्य करा, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना स
पाकिस्तानमध्ये २५ जुलैैला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील वातावरण तापू लागले असून हिंसाचाराच्या घटनाही वाढत आहेत. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चा उमेदवार अतिरेक्यांनी रविवारी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याचे अंगरक्षक व वाहनचालक असे दोघे जण ठार झाले आहेत. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानातील उमेदवारांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे.
खैैबर पख्तुनवा येथील डेरा इस्माइल खान या भागात पीटीआयचे उमेदवार इक्रमुल्ला गंडपूर हे पीके-९९ या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
प्रचारासाठी जाताना त्यांच्या वाहनावर आत्मघाती हल्ला केला गेला. त्यात इक्रमुल्ला गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खैैबर पख्तुनवा प्रांताचे ते माजी कृषीमंत्री आहेत. इक्रमुल्ला यांचे भाऊ व माजी कायदामंत्री इसरुल्ला गंडपूर हे दहशतवाद्यांच्या हल्ल्यातच ठार झाले होते. त्यानंतर पीके-६७ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत इक्रमुल्ला निवडून आले होते.
बन्नू जिल्ह्यातही जमियत-उलेमा-इस्लाम-फज्ल (जेयूआय-एफ)चे नेते अक्रम खान दुर्रानी हे मात्र त्यांच्या वाहनावर दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारातून सुदैैवाने बचावले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या विरोधात अक्रम खान दुर्रानी मुत्तहिदा मजलिस-ए-अमल या पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. गेल्या काही दिवसांत दुर्रानी यांच्यावर झालेला हा दुसरा हल्ला असून बन्नू जिल्ह्यात आतापर्यंत उमेदवारांवर तीन हल्ले झाले आहेत.
आयएसआयविरोधात निदर्शने
नवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी रावळपिंडी येथील आयएसआयच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. ‘यह जो दहशद गर्दी हैै, उसके पिछे वर्दी हैै अशा आयएसआयच्या निषेध करणाºया घोषणा ते देत होते. त्यांनी आयएसआय मुर्दाबादच्या घोषणांनीही परिसर दणाणून सोडला होता. या पक्षाचे नेते हनीफ अब्बासी यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने हे कार्यकर्ते संतप्त झाले होते. पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत आयएसआयने गडबड, गोंधळ चालविली असल्याचा आरोपही या शरीफ समर्थक निदर्शकांनी केला.