पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौर यांचा राजीनामा, पदासाठी इच्छुकांचे देव पाण्यात...
पक्षाने दिलेली सव्वा वर्षाची मुदत संपल्याने महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. उपमहापौर यांनी महापौर यांच्याकडे तर महापौरांनी महानगर पालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला.
कालच मुख्यमंत्री शहरात येऊन गेले आणि राजकीय घडामोडीना वेग आला, मुदत संपल्यामुळे राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार काळजे आणि मोरे दोघांनीही आज (मंगळवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापालिकेत आता नवा गडी नवे राज्य येणार आहे. प्रशासनाने नवीन महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.
महापौरपदासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शशिकांत कदम, राहुल जाधव, संतोष लोंढे यांसह अनेक नगरसेवक महापौर पदासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत.
लवकरच कळेल कोणाच्या पारड्यात दान पडतेय...