पक्ष वाढीसाठी नव्या उमेदिने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी काम करतील - डॉ. रत्नाकर महाजन

पक्ष वाढीसाठी नव्या उमेदिने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी काम करतील - डॉ. रत्नाकर महाजन 
सचिन साठेंसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामा अस्र मागे...
पुढील काळात कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने, नव्या उमेदिने, निश्चित उद्दिष्ठ गाठण्याच्या हेतूने कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरुन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व इतर सर्व पदाधिका-यांनी आपले राजीनामे मागे घेतले असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बुधवारी सांगितले. 
 
    यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अख्तर चौधरी तसेच गौतम आरकडे, राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, माजी महिला प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, सुदाम ढोरे, विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंखे, परशुराम गुंजाळ, शाम अगरवाल, लक्ष्मण रुपनर, नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, विशाल कसबे, शहाबुद्दीन शेख, किशोर कळसकर, तानाजी काटे, सज्जी वर्की, ॲड. क्षितीज गायकवाड, मकरध्वज यादव, ॲड. अनिरुध्द कांबळे, उमेश खंदारे, हिरा जाधव, चंद्रशेखर जाधव आदींसह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
      ठ सचिन साठे म्हणाले की, शहर कार्यकारीणीने केलेल्या सुचनांबाबत प्रदेश अध्यक्षांसह सर्व पदाधिका-यांनी सकारात्मक भुमिका घेतली व राजीनामा मागे घेण्यास सांगितल्यामुळे राजीनामा मागे घेतला. पुढील काळात अधिक जोमाने पक्ष संघटना वाढवू असे साठे म्हणाले. 
 
       मराठा आरक्षणाबाबत डॉ. महाजन यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुरु असणा-या आंदोलनाला कॉंग्रेसने यापुर्वीच पाठींबा जाहिर केला आहे. 2014 च्या निवडणूकीत भाजपाने मराठा आणि मुस्लिमांना शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचे निवडणूक जाहिरनाम्यात आश्वासन दिले होते. वस्तूत: यापुर्वीच आघाडी सरकारने मराठा व मुस्लिमांना आरक्षण दिले होते. नंतर हा विषय न्यायालयात गेला व विधानसभा निवडणूक जाहिर झाली. तरी सुध्दा भाजपाने निवडणूक प्रचारात आरक्षणाचे आश्वासन दिले. याला चार वर्षे उलटून गेली. आता आरक्षणासाठी आंदोलनकर्ते शांतपणे रस्त्यावर येऊन आंदोलन करीत असतील तर त्यांच्याबाबत निंदा करुन, गैरप्रचार करुन, त्यांच्या हेतूवर शंका घेऊन, नालस्तीचा प्रचार करुन दिलेल्या आश्वासनांपासून पळून जाणे निषेधार्थ आहे. तुम्हीच दिलेली आश्वासने पुर्ण करता येत नसतील तर न्यायालयाच्या आड लपता कशाला? अगोदरच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भाजपाची आहे. प्रश्नांबाबत पळून जाण्याचा प्रयत्न करणे निषेधार्थ आहे. असेही डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले. 

Review