काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे - डॉ.भास्करराव खर्डे
काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे,असे प्रतिपादन डॉ.भास्करराव खर्डे पा.यांनी केले. कोल्हार येथील स्व.माधवराव खर्डे पाटील चौकात फडणवीस सरकारचा निषेध व काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अशा संयुक्तिक सभेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अँड. सुरेंद्र खर्डे पा, कोल्हार बु!! ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्निल निबे, भगवतीपुरचे सरपंच रावसाहेब खर्डे, उपसरपंच अशोक दातीर, शिवकुमार जंगम, शाम गोसावी,डॉ. संजय खर्डे, अनिल खर्डे, श्रीकांत खर्डे, भास्कर दिगंबर खर्डे, अमोल खर्डे, अतुल राउत, वीरेश खर्डे, गणेश राउत, प्रदीप खर्डे,अविनाश खर्डे, संतोष थेटे, अजिंक्य भगत, वैभव हारदे, पंकज हारदे, ऋषिकेश निबे, विराज म्हसे, महेश राउत, विशाल कापसे, संकेत शिंदे, संकेत कापसे आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अँड. सुरेश खर्डे पा. म्हणाले, "144 आमदार मराठा समाजाचे असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही, फडणवीस सरकार आरक्षण आंदोलनाला राजकीय वळण देत आहे, यामुळे मुख्यमंत्र्यानी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून पायउतार व्हावे आणि जलसमाधी घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.
शिवकुमार जंगम, जावेद शेख, सुरेश पानसरे यांनी फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त करणारी भाषणे केली. जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा निकुंभ यांनी केले, लोणीचे पी.आय.रणजीत गलांडे यांना यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले, कोल्हार भगवतीपुर येथे दिवसभर बंद पाळण्यात आला.