मराठ्यांच्या उग्र आंदोलनाला सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार - जगजीवन काळे
मराठा समाजाच्या आंदोलना योग्य वेळी प्रतिसाद न देता, वेळकाढुपणा करत लोकशाही मार्गाच्या आंदोलनाला चुकीचे वळण देत, न्याय्य हक्क मागणीच्या आंदोलनाला बदनाम करुन दाबण्याचा प्रयत्न होतोय हे चुकीचे आहे. शांत आणि संयमी मराठ्यांच्या आजच्या उग्र आंदोलनाला सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे, असे प्रतिपादन मराठा महासभेचे अध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत जगजीवन काळे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
मराठा आरक्षणा संदर्भात राज्यात ५८ मुक मोर्चे निघूनही कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही. नुसतीच आश्वासने व घोषणा होत असलेल्या पाहायला मिळताहेत . मराठा समाजाच्या आरक्षण या विषयाच्या पाश्वभुमीवर समाजा समाजामध्ये , जाती जातींमध्ये वाद होऊन विषयाला रंग देण्यासाठी प्रयत्न केले गेले. आरक्षण या विषयाचा सामाजिक व राजकीय लोकांनी चोथा केला आहे. आरक्षण हा विषय समजूनच घेतला जात नाही.
देशातील जनतेचा मुळ प्रश्न हा आहे की , अन्न वस्र निवारा या मुलभुत गरजांबरोबर शिक्षण रोजगार आरोग्य व सुरक्षा जनतेपर्य॔त कधी पोहोचणार ? आज भांडवलशाहीला मोठ्या प्रमाणात सवलती व अर्थ सहाय्य मिळते पण राबणार्या कामगार व शेतकर्यांचे हाल कधी संपणार . दुर्बल मागास वृध्द मुले मुली महीला कामगार व शेतकरी सुरक्षित व सुखी जीवन कधी जगणार ? असा सवालही काळे यांनी उपस्थित केला.
या वेळी मराठा महासभेचे पुणे शहराध्यक्ष गिरिश चव्हाण, छावाचे बाबासाहेब पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.