मला राजकारण शिकवू नका, मी १४ निवडणूक लढलोय...

मी माझ्या राजकीय कारकीर्दीत १४ निवडणुका लढवल्या आहेत. यापैकी ७ निवडणुका थेट जनतेमधून लढून जिंकल्या आहेत, माझ्याविषयी जपून बोलावे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली.

कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, मंत्री पाटील यांनी अद्याप एकही निवडणूक जनतेमधून लढवलेली नाही. पाटील यांनी आधी एक निवडणूक जनतेमधून लढवून दाखवावी, आणि मगच माझ्यावर बोलावे,

काहीही विधान करून खळबळ उडवून देणे, हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची विधाने गांभीर्याने घेण्यासारखी नाहीत. त्याचबरोबर हीच गोष्ट मुखमंत्र्यांना लागू होत आहे. एक गोष्ट चांगली आहे, येणाऱ्या काळात निवडणूक होणार आहेत. त्याचा आम्हालाच फायदा होईल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राज्यात मराठा समाजाचा उद्रेक सुरू असून आगीत तेल ओतण्याचे काम मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील करत आहेत, असे पवार म्हणाले.

 

Review