नवनिर्मित अपर पोलीस आयुक्त पदावर मकरंद देशपांडे यांची नियुक्ती...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवनिर्मित अपर पोलीस आयुक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील मकरंद देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. 27) काढलेल्या आदेशान्वये भारतीय पोलीस सेवेतील 19 अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मकरंद रानडे यापूर्वी अपर पोलीस आयुक्त ठाणे शहर येथे कार्यरत होते. त्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अपर पोलीस आयुक्त या नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवारी करण्यात आलेल्या बदल्यांच्या आदेशामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी अपर पोलीस आयुक्तांसह नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात पोलीस उप आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर पोलीस आयुक्त म्हणून कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.