मराठा आरक्षणासाठी पिंपळगावात कडकडीत बंद
मराठा समाजाची आजची आर्थिक आणि प्रशासकीय स्थिती पाहुण यावर सामाजिक उपाय म्हणून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पिंपळगाव (ता.दौण्ड) येथे सर्व समाजाच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी सरपंच रमेश कापरे, बाळा नातु, शंकर शेलार, बाबुराव कापरे, बबन कापरे, अमोल नातु, सुनिल नातु, लक्ष्मण वागसकर, बाबा रानवडे, निलेश थोरात, दिपक गाडेकर, माऊली कापरे, अनिल थोरात, संतोष नातु, सुनिल शितोळे, भाऊ विश्वासे, माऊली घुबडे, श्रीहारी नातु, गणेश थोरात आदी मान्यवरांसह सर्व समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्रात मराठा समाजाचे ५८ मुकमोर्चा निघाले, यातुन समाजाने एक आदर्श निर्माण केला. करोडो लोक रस्त्यावर उतरूनही कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. पण याची कोणतीही दखल सरकारने घेतली नाही. जर शांतीने समजत नसेल तर क्रांतीने आरक्षण मिळवू, या त्वेषाने आता समाज रस्त्यावर उतरला आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या या आंदोलनाला समाजातील सर्व समाजबांधव एक होऊन लढा देत आहेत आणि या लढ्याला इतर जाती धर्माच्या जनतेचाही सक्रीय पाठींबा मिळत आहे. याचीच प्रचिती मराठा क्रांती ठोक मोर्चाला येत आहे.
पिंपळगावातील सर्व गट, तट आणि राजकारण बाजुला ठेऊन, सर्व समाजबांधव एक होत आहेत. यामुळे या आंदोलनाला अजूनच पाठबळ मिळेल असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी निलेश थोरात, सुनिल नातु, बाळा नातु, अमोल नातु यांनी आपले मनोगत व्यक्त केले.