मनसेचे भाजपच्या निषेधार्थ पालिकेत आणली तिरडी: सुरक्षारक्षकांनी आंदोलकांना रोखले

 
पिंपरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पिंपरी,चिंचवड,भोसरी विधानसभेतील स्मशानभूमींची दुरावस्था झालेल्या निषेधार्थ महापालिकेच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तिरडीसह महापालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले.
 
निगडी स्माशान भुमी मधील विद्युत दाहिनी गेले १५ वर्षा पुर्वीची विद्युत दाहिनी वापरण्याची काल मर्यादा १० वर्ष  गेले ३ वर्षापासुन आपण मागणी करतो नविन बसवा 
प्रशासन त्यावर काही बोलायला तयार नाही. गेले खुप दिवसापासुन  हि विद्युत दाहिनी कधी चालु तर कधी बंद असते .  त्यामुळे नांगरीकाना त्रास सहन कराना लागत आहे.  
 
वडमुखवाडी येथील स्मशांभूमिचा असून हा प्रश्न गेली २२ वर्षापासून तसाच प्रलंबित राहिला आहे . स्मशानभूमी नसल्याने नागरिकाना चार – ते पाच किमी चा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या भागातील प्रेतात्म्याची होणारी हेळसांड कायम आहे . चिंचवडगाव येथील गेली १० वर्ष झाली प्रलंबित असलेली स्मशानभूमी
चिंचवडगाव कराना  हक्काची स्मशानभूमी नसल्यामुळे सर्व ग्रामस्थांना नाईलाजास्तव दुसर्या गावात जाऊन अंत्यविधी करावा लागतो.
 
जुनी सांगवीतीन वर्षापासून नागरिकांना उन,,पाऊस डोक्यावर घ्यावा लागत आहे. कारण आरसीसी शेडच नाही. वारंवार पत्र देईन देखील अद्याप काम नाही. स्थापत्य विभागाकडून उडवाउडविची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वात हे  तिरडी ओदोलंन केले.

Review