दिशा समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश जावडेकर, खासदार आढळराव पाटील यांना नारळ
केंद्र सरकारच्या योजनांवर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या दिशा समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून खासदार आढळराव पाटील यांना नारळ देण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या वतीने जिल्हाभरात विविध योजना राबविल्या जातात. त्या योग्य पद्धतीने राबवून घेणे आणि योजनांवर देखरेख करण्यासाठी केंद्र सरकारने २००६ मध्ये दिशा समिती स्थापन केली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांवर ही समिती देखरेख ठेवते.या समितीच्या अध्यक्षपदावर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची केंद्राने नियुक्ती केली.पाटील हे २००७ पासून म्हणजे गेली १७ वर्षे या समितीचे अध्यक्ष होते.