पोलीस उपायुक्त पदावर स्मार्तना पाटील यांची नियुक्ती
पिंपरी-चिंचवड येथिल नुतन पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त पदावर स्मार्तना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्मार्तना पाटील यापूर्वी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली. नम्रता पाटील यापूर्वी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) पदावर कार्यरत होत्या. तर विनायक ढाकणे पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर येथे कार्यरत होते. आयुक्तालयाची अति वरिष्ठ, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वेगाने नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या १५ ऑगस्ट रोजी आयुक्तालय सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.