कायदा मोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी. अपना वतनची आयुक्तांकडे मागणी

महापौर निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत व आवारामध्ये भंडारा उधळून व विनापरवानगी वाद्य वाजवून महापालिका अधिनियम व प्रदूषण अधिनियम पायदळी तुडवला गेला आहे. असे कार्यकर्ते आणि  संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अपना वतन संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना केली आहे. यावेळी अध्यक्ष सिद्दीक शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधर्यांनी स्वतःच या नियमनाचे उल्लंघन केले आहे.  तसेच परिसरात बेकायदेशीरपणे जमाव गोळा करून वाद्य वाजवून त्याठिकाणी कामासाठी आलेल्या नागरिकांची व महापालिकेच्या कर्मचर्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केला. मोठ्या प्रमाणावर भांडारा उधळून व वाद्य वाजवून ध्वनी व वायू प्रदूषण केले आहे. त्यांच्या या बेकायदेशीर वागण्याने महापालिका चा अवमान झाला असून त्या ठिकाणी उपस्थित अनेक नागरिकांना या गोष्टींचा प्रचंड त्रास सहन करावा लागला . तसेच अनेक जण या भांडारयावरून घसरून खाली पडले आहेत. यावेळी सुरक्षा व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याना हे कृत्य करण्यापासून रोखने आवश्यक होते. 
          जनतेच्या प्रश्नावर जेंव्हा मनसेने व राष्ट्र्वादीने आंदोलन केले होते. त्यावेळेस मनसेच्या व राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसहित इतर कार्यकर्त्यांवर पिंपरी चिंचवड पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत.त्यामुळे आता भाजपच्या या कायदा मोडणाऱ्यावर अतिउत्साही लोकांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे . सुरक्षा विभाग व पर्यावरण विभागाच्या दुर्लक्षमुळे अनेक नागरिकांना त्रास झाला तसेच ध्वनी व वायू प्रदूषण अधिनियमाचे सर्रासपणे उल्लंघन झाले आहे.  परंतु सद्याचे महापौर झाले नाही तोवरच त्यांनी कायद्याचे उल्लंघन करण्यास सुरवात केली आहे. हे निषेधार्ह आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार घडत असताना बघ्याची भूमिका घेणारे अधिकारी या प्रकारास सर्वस्वी जबाबदार असल्येन त्यांच्यावर बेकायदा जमाव जमवणे ,सरकारी आवरत शांतता  भांग करून कामत अडथळा निर्माण करणे व महारष्ट्र वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण १९८३ व ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण अधिनियम २००० नुसार तातडीने गुन्हे दाखल करावेत अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने आपल्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Review