चर्मकार बांधवांसाठी भव्य सांस्कृतिक भवन उभारणार - महापौर जाधवांचे स्वाभिमानी चर्मकार महासंघाला आश्वासन..

(सह्याद्री बुलेटीन, पुणे)  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चर्मकार समाज बांधवांसाठी त्यांना एकत्रित येण्यासाठी भव्य असे सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून तसेच पिंपरी-चिंचवड शहरात गटई काम करणार्‍या चर्मकार समाजातील बांधवांना महापालिकेच्या माध्यमातून बैठा पीच परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
संत तुकारामनगर येथील संत रोहिदास क्रिडा व सांस्कृतिक भवन येथे रविवारी 05 ऑगस्ट  रोजी स्वाभिमानी चर्मकार महासंघाची पिंपरी-चिंचवड शहरामधील ‘चर्मकार समाज जोडो अभियान’, शहर कार्यकारीणी निवड व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजत करण्यात आले होते. सदर बैठकीस राष्ट्रीय महासचिव गोरख ननवरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पोटे, प्रदेश कार्याध्यक्ष जयदेव इसवे, प्रदेश संघटक विकास तिखे, पुणे जिल्हा वधू - वर जिल्हाध्यक्ष रामचंद्र (आबा) गद्रे, पुणे जिल्हा संत रोहिदास प्रचारक संतोष तिखे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय लोकापुरे, दत्तात्रय भोसले (बारामती), पुणे शहराध्यक्ष विकास सोनवणे यांच्या मार्गदर्शनामध्ये संघटनेची पुढील दिशा व वाटचाल ठरविण्यात आली.यावेळी पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे सचिवपदी चंद्रकांत सोनवणे, उपाध्यक्ष अनुराग शेरखाने, कार्याध्यक्ष राम सावळे, सहसंघटक रामभाऊ शेटफळ, खजिनदार दशरथ कांबळे, सहखजिनदार अभय वर्पे, संघटक शिवराज साळी, सल्लागार शिवाजी गायकवाड, काळुराम ढोबळे,  सदस्य धनंजय पोटे आदी पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
 
महापौर म्हणाले सामाजिक  क्रांतीचे अग्रदूत संत गुरू रोहिदास (रविदास), वीर कक्क्या, पितामहा हरळय्या यांचे क्रांतीकारक विचार व त्यांनी केलेले समाज प्रबोधनपर कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या वतीने समाजापर्यंत पोहचल्यानंतर खर्‍या अर्थाने समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.
स्वाभिमानी चर्मकार महासंघ पिंपरी-चिंचवड शहर व पदाधिकारी यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देवून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना व संघटनेला शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले. महापौर जाधव यांनी पुढे सांगितले की, 
 
कार्यक्रमाच्या शेवटी संजय लोकापूरे व प्रथमेश पोटे यांच्या वाढदिवसानिमीत्त केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या बैठकीचे नियोजन नवनिर्वाचित शहराध्यक्ष दत्तात्रय कांबळे (सा. प्रगत भारत) यांनी केले होते.

Review