तमिळ राजकारणातील दिग्गज आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे निधन
( सह्याद्री बुलेटीन, पुणे ) तमिळी राजकारणाचे पितामह, द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) सर्वेसर्वो आणि तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कावेरी रूग्णालयाच्या वतीने मेडिकल बुलेटिन जाहीर करून सांयकाळी ६.१० वाजता करूणानिधी यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
एम. करुणानिधि यांचा जन्म मुत्तुवेल आणि अंजुगम यांच्या पोटी 3 जून 1924 रोजी नागपट्टिनमच्या तिरुक्कुभलइ मधे झाला. त्यांच्या मागे दोन पत्नी दयालु, रजति. आणि एम. के. मुत्थु, एम. के. अलगिरि, एम. के. स्टालिन, एम. के. तमिलारासु, एम. के. सेल्वी, एम. के. कनिमोझी ही मुले आहेत.