कोल्हार भगवतीपुरचा महाराष्ट्र बंद ला सक्रीय पाठींबा... गावाने पाळला कडकडीत बंद
कोल्हार(सह्याद्री बुलेटीन) - मराठा क्रांती मोर्चा ने महाराष्ट्र बंद च्या केलेल्या अहवालाला प्रतिसाद देत कोल्हार भगवतीपुर येथील नागरिकांनी आज दिवसभर कडकडीत बंद ठेवीत व नगर-मनमाड राज्य मार्गावरती रास्ता रोको करीत महाराष्ट्र बंद मध्ये सहभाग घेतला. सकाळी नऊ वाजता कोल्हार भगवती येथील मराठा क्रांती मोर्चा चे काही कार्यकर्ते येथील छत्रपती शिव छत्रपती चौकालगत असलेल्या नगर मनमाड राज्यमार्गावर एकत्रित आले आणि रास्ता रोको केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. यावेळी अँड. सुरेश खर्डे पाटील, शिवा निकुंभ, सुरेश पानसरे, गुणवंत आठरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोणी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. रणजीत गलांडे यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

यावेळी अमोल खर्डे,अतुल राउत, वीरेश खर्डे, गणेश राउत , प्रदीप खर्डे, अविनाश खर्डे, संतोष थेटे, अजिंक्य भगत, वैभव हारदे, पंकज हारदे, ऋषिकेश निबे, विराज म्हसे, महेश राउत, विशाल कापसे, संकेत शिंदे, संकेत कापसे तसेच नायब तहसीलदार सचिन म्हस्के हेही उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी या वेळी राज्यमार्गावर ठिया देऊन बसलेल्या आंदोलकांना पाणी आणि केळी वाटप केले. दिवसभर बंद शांततेत पार पडला.
