१५ ऑगस्ट पासून पोलिस आयुक्तालयाचे कामकाज सुरु...

नवर्निवाचीत पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी हा आदेश काढला असून त्यामध्ये पोलीस आयुक्त, पुणे शहर व पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराकरीत निर्माण करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्ट पासून प्रत्यक्षात सुरु करण्याची शासन मान्यता देण्यात आली आहे.

Review