माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन...
माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्यामुळे सोमनाथ चॅटर्जी हे व्हेंटिलेटरवर होते. सोमनाथ चॅटर्जी यांना गेल्या अनेक दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजारानं ग्रासलं होतं. त्यामुळे डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर देखरेख ठेवून होती. सोमनाथ चॅटर्जी यांनी सीपीएम पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सन 1968 ते 2008 पर्यंत त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता ते नेता म्हणून सक्रियपणे कामकाज पाहिले. तर 1971 मध्ये पहिल्यांदा ते खासदार बनून संसदेत पोहोचले. तब्बल 10 वेळा ते खासदार राहिले आहेत.