तरुणांनी आपली क्षमता ओळखून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे - मानव कांबळे
( सह्याद्री बुलेटिन ) आज देशामध्ये अराजकतेची स्थती निर्माण झाली आहे. देशासमोर बेरोजगारी ,शिक्षण ,महिलांवरील अत्याचार ,दंगली,आरोग्याचे प्रश्न ,भ्रष्टाचार , आर्थिक व सामाजिक विषमता यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागरिकांच्या मूलभूत गरज सुद्धा पूर्ण होत नाहीत.त्यामुळे तरुणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु आजचे तरुण या समस्यांबाबत गांभीर्याने विचार करीत नसल्यची खंत त्यांनी व्यक्त केली. तरुणांमध्ये क्रांती घडवण्याची ऊर्जा असते त्या ऊर्जेचा सदुपयोग देशासाठी करावा असे आव्हान त्यांनी तरुणांना केले. प्रामाणिकपणा व कामामध्ये सातत्य ठेऊन वाटचाल केली तर नक्कीच बदल घडेल अशा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे त्यांनी व्यक्त केला.
अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार दि. १२/०८/२०१८ रोजी " कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ते बोलत होते.
त्यावेळी ऍडव्होकेट किरण शिंदे व ऍडव्होकेट मोहन अडसूळ अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख , कार्याध्यक्ष राजू शेरे ,सचिव दिलीप गायकवाड ,प्रवक्त्या सॅन्ड्रा डिसोझा ,महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर ,शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा ,चिंचवड विभागप्रमुख फारुख शेख, संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर ,बेटींना दास ,पूजा सराफ ,रूपा दास ,मन्सूर शेख ,गणेश हिंगडे ,मुज्जफर इनामदार ,देवदास गवारे,हाजीमलंग शेख ,सादिक शेख ,आरती कोळी ,केशव मुदगल , यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी तौफिक पठाण यांनी सर्वांचे आभार मानले .