छावा मराठा युवा महासंघ शहराध्यक्षपदी राज गोदमगावे यांची नियुक्ती...

(सह्याद्री बुलेटीन)  महाराष्ट्राच्या वैचारिक आणि आक्रमक विचारांचा वारसा जपणाऱ्या छावा मराठा युवा महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी, युवा नेते राज गोदमगावे यांची नियुक्ती, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश देवकर पाटील यांनी केली आहे.
तरूणांच्या विचारांना दिशा मिळावी आणि एक सृजनशील समाज निर्मितीसाठी सर्वांना एकत्र  करणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न केले जातील. असे मनोगत यावेळी नवनिर्वाचित शहराध्यक्षांनी व्यक्त केले.
 यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक/अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देवकर पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र (नाना) फुगे, पिंपरी चिंचवड शहर(जिल्हा) उपाध्यक्ष राजु पवार, विद्यार्थी आघाडी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) शहराध्यक्ष गौरव धनवे, उपाध्यक्ष कुंदन कातुरे, थेरगाव शाखा अध्यक्ष विजय लोट व छावा मराठा युवा महासंघाचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Review