स्वातंत्र्य दिन साजरा करून स्वातंत्र सेनानी गेला... अटलजी गेले

माजी पंतप्रधान आणि  अजातशत्रू व्यक्तीमत्व अटलबिहारी कुंजबिहारी वाजपेयी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होण्याचा मान वाजपेयींनी मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वाजपेयी यांचं निधन म्हणजे एका युगाचा अंत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. 
जाणून घेऊया अटलजींबद्दलच्या काही गोष्टी...
१) आग्रा येथील बटेश्वर हे गाव वाजपेयी कुटुंबीयांचे मूळ गाव होते. 
२) राज्यशास्त्र विषयात प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवी मिळवली होती. हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयातही त्यांनी विशेत प्रावीण्य मिळवले  होते.
३) ग्वाल्हेरच्या आर्य कुमार सभा या संघटनेच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.
४) बाबासाहेब आपटे यांच्या सांगण्यावरून त्यांनी १९३९ साली संघात प्रवेश केला. त्यानंतर १९४७ साली ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. 
५) १९४२ साली ब्रिटीश सरकारविरुद्धच्या छोडो भारत चळवळीच्यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रेम यांना अटक करण्यात आली होती. त्यांना २३ दिवस तुरुंगात राहावे लागले होते. 
६) अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयात एकत्रच कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर ते वसतिगृहावरही एकत्रच राहायचे.
६) उत्तर प्रदेशातील दीनदयाळ उपाध्याय दैनिकाच्या 'राष्ट्रधर्म' या मासिकाची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय, संघाच्या 'पांचजन्य' तसेच 'वीर अर्जून' व 'स्वदेश' या दैनिकांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. 
६) पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अटलबिहारी वाजपेयी एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तविले होते. 
७) संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारा पहिला नेता...
८) हेमा मालिनी यांचा  'सीता और गीता' हा चित्रपट त्यांना इतका आवडला होता, की त्यांनी जवळपास 25 वेळा तो पाहिला होता. 
९) तीनवेळा देशाचे पंतप्रधान झाले. मात्र यापैकी केवळ एकदा त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. 
१०) वाजपेयी पंतप्रधान असताना भारतानं पोखरणमध्ये एका पाठोपाठ एक पाच अणू चाचणी केल्या. अतिशय गोपनीयपणे या चाचण्या करण्यात आल्या होत्या. 
११) वाजपेयी चार राज्यांमधून लोकसभेवर गेले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि दिल्लीमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
१२) 2015 मध्ये वाजपेयींना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न प्रदान करण्यात आला. 
हा व्हिडिओ अवश्य पहा...
मोटीव्हेशनल अटलबिहारी

Review