अटलबिहारी यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याऐवजी सिद्धू यांनी पाकिस्तानला...

एके काळी ज्याला अटलजींचे नाव घेल्या शिवाय जेवण जात नव्हते, ज्याचा धर्म आणि कर्म अटलबिहारी वाजपेयी होते तोच राजनेता आता पक्ष बदलला कि स्वतःच्याच इतिहासाला कशी तीदेतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे नवजोतसिंग सिद्धू आहे, भारताचे माझी पंतप्रधान आणि मार्गदर्शक अटलबिहारी यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्याऐवजी सिद्धू यांनी पाकिस्तानला जाणं पसंत केल्यानं अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांशी गळाभेट घेतल्यानंही त्यांच्यावर टीका होत होती. तसंच, शपथविधी सोहळ्यावेळी सिद्धू यांना पाकव्याप्त काश्मीरच्या प्रमुखांशेजारी बसवण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. परंतु, मी भारताचा सदिच्छा दूत म्हणून आलोय, असं सांगत सिद्धू यांनी सर्व विषयांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Review