दाभोळकर हत्या प्रकरणी सचिन अंधुरे सीबीआयच्या ताब्यात...

(सह्याद्री बुलेटीन)  नरेंद्र दाभोळकरांवर गोळी झाडणाऱ्या  सचिन अंधुरे या आरोपीला अटक करण्यात सीबीआयला पाच वर्षांनंतर यश आले आहे.

औरंगाबाद येथून 14 तारखेला रात्री सचिन अंधुरे या आरोपीला अटक करण्यात आले आहे. औरंगाबादेतील रोजा बझार भागातील तो रहिवासी आहे. सीबीआय आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत. त्यामुळे यात आणखी कोणाचा हात आहे का आणि कोणाच्या या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं आता याचाही लवकरच उलघडा होईल का ? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास ९ मार्च २०१४ रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाकडेच (सीबीआय) वर्ग करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने विरेंद्र तावडेला अटक केली. तावडेला सीबीआयने १० जून 2016 रोजी नवी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर त्याला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात झालेली ही पहिली अटक आहे. पनवेलजवळील कळंबोली येथे तावडेचा दवाखाना आहे. तावडे याचे पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीत घर आहे. तो हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे. १ जून 2016 रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे टाकले होते.

 

पुण्याच्या सीबीआय न्यायालयातून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर तावडे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या वेळी काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे या दोघांचा ई-मेलवरून संपर्क होता, असे तपासात दिसून आले होते. त्यानंतर सचिन आंदुरे याला अटक झाली आहे.

Review