आध्यात्मिक गुरु महंत रामगिरीजी महाराज

(सह्याद्री बुलेटीन, महाराष्ट्र)  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ,औरंगाबाद जिल्हच्या सीमेवर असलेले नयनरम्य तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र सराला बेट होय. श्री क्षेत्र सराला बेट हे गोदावरी च्या कुशीत वसलेले एक नयनरम्य तीर्थक्षेत्र होय. सराला हे भगवान शिव शंकराचे फार प्राचीन असे तीर्थक्षेत्र आहे 
या बेटामध्ये सद्गरु श्री गंगागीरीजी महाराज यांनी वास्तव्य केले व येथुन  वारकरी सांप्रदयाचे कार्य केले गंगागीरीजी महाराज यांचे व साईबाबांचे निकटचे संबंध होतें. कै. गोविंद रघुनाथ दाभोलकर कृत श्रीसाई चरित्र आध्यायातील ओव्यावरून ते अधिक स्पष्ट होते 
आध्यात्मिक गुरु महंत रामगिरीजी महाराज
त्याचप्रमाणे गंगागीरीजी महाराजांच्या काळापासून सप्ताहाची जी परंपरा आहे ती आजतागायत महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सरु आहे . 
मार्च २००९ मध्ये गुरुवर्य महंत रामगिरी महाराज सरला बेटाचे मठाधिपती झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने सप्ताह होऊ लागले .रामगिरी महाराजांनी अखंड हरिनाम सप्ताहाची व्याप्ती त्यांच्या अमृत वाणीने कीर्तनाच्या प्रवचनाच्या आणि भागवत कथेच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमांतर्गत इतकी भव्य दिव्य वाढविली कि राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक सप्ताहास कोणतेही आमंत्रण न देता स्वयं स्फुर्थीने स्वखर्चाने स्वतःच्या व्यवस्थेवर येत असतात. आणि भजन कीर्तन आणि आमटी भाकरीचा स्वाद घेतात.
गंगागीरीजी महाराजांचे एक ब्रीदवाक्य होते ते म्हणायचे कि ,देणे को अन्नदान | लेणे को हरीनाम | तरनेको लीनता | डूबने को आभिमान ||. आणि याच वाक्याची आठवण महंत रामगीरीजी महाराज हे देखील सर्वाना करवून देतात 
रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सराला बेटात गोशाळा व तसेच मठात शिक्षण घेण्यासाठी मठामध्ये साधारण  ९० ते १०० विध्यार्थी असनू त्यांचा खर्च तसेच सध्या सरला बेटावर सुरु असलेले भव्य मंदिरचे बांधकाम, भक्त निवासाचे तसेच मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाचे तसेच गाईसाठी भव्य अशी गोशाळा तसेच भक्तांना स्नान करण्यासाठी घाटाचे बांधकाम चालू आहे. हा सर्व खर्च महंत रामगीरीजी महाराज करीत असून कीर्तन करून तसेच लोकांनी दिलेल्या दानातनू हे सर्व कामे महाराज करीत आहे.
सराला बेटात येणाऱ्या भावीकांची सोय व्हावी म्हणनू महंत रामगीरिजी महाराजांनी हे काम मोठ्या अभिमानाने सुरु ठेवले आहे. तसेच रामगिरीजी महाराज लोकांना आपल्या प्रवचन व कीर्तना मधून दारू ,गुटखा ,तंबाकू  मुक्तीसाठी दररोज उपदेश करून त्याच्यापासनू होत असलेली शारीरिक हानीतनू होणारे दुष्परिणाम लोकांना पटवनू देतात .
परम पूज्य ह भ प गंगागिरी , परम पूज्य ह भ प नारायणगिरी यांचा आध्यात्मिक वारसा समर्थपणे व अखंडीत सुरु ठेवून आध्यात्मातून समाज परिवर्तनाचे कार्य महंत रामगिरीजी महाराज करत आहेत.
 
- साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण
मो - ९०११८९०२७९ 

Review