पुन्हा गाड्यांची तोडफोड

(सह्याद्री बुलेटीन) पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरामध्ये  वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार  हे दिवसेंदिवस वाढत असून  चार दोन गुंडांनी यायचं, गाड्या फोडायचा, तोंडाला रुमाल बांधायचे आणि निघुन जायचं ही गोष्ट एकदा घडली.  ती पचली, दुसऱ्यांदा घडली, तिसऱ्यांदा घडली, चौथ्यांदा घडली, हे सतत घडत आहे यावरती पोलीस यंत्रणा  आणि प्रशासन काय कारवाई करतात?

सुरुवातीलाच या गोष्टीवरती कठोर कारवाई केली असती तर नंतरच्या बाकीच्या गोष्टी घडल्याच नसत्या पण दुर्दैवाने  जोपर्यंत मोठा गुन्हा घडत नाही  किंवा  लाखो-करोडोंचे एकाच वेळी नुकसान होत नाही, प्राणहानी, माल हानी मोठ्या प्रमाणात होत नाही तोपर्यंत या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करायचाच नाही का ?

 जे गावगुंड मोठ्या प्रमाणात गाड्या फोडण्याचं काम करतायत आणि राजरोसपणे शहरांमध्ये फिरत आहेत  त्यांना जर आळा बसला नाही तर मात्र  कोणाचीही गाडी  आणि कोणाचंही वाहने सुरक्षित राहणार नाही  याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे शहरात वाहन तोडफोडीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. चतुःश्रूंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

चतुःश्रूंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्तूरबा वसाहत येथे शनिवारी रात्री वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी, हातगाडी आदी वाहनांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

Review