२ सप्टेंबर पासून घरगुती इको फ्रेंडली गणपती बनविण्यासाठी चिंचवड येथे कार्यशाळेचे आयोजन...

पर्यावरण आणि भक्ती भावनेचा समन्वय साधत पर्यावरण पुरक घरगुती गणेश मुर्ती बनविण्यासाठी महाराष्ट्र मिशन एज्युकेशन अँड करिअर, चिंचवड येथे दिनांक 2 सप्टेंबर, 2018 पासून प्रशिक्षण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नैसर्गिक रंगांचा वापर करून, पर्यावरणाला कोणताही धोका होणार नाही अशा स्वतः घरी बनविता येणाऱ्या शाडू मुर्तींचे यात प्रशिक्षण असेल...

मूर्ती बनवण्यासाठी माती कशी तयार करायची
मोल्ड बद्दल माहिती
गणपती/मूर्ती चे वेगवेगळे भाग कसे बनवायचे
मूर्ती कशी सुखवयाची
मूर्ती चे वेगवेगळे भाग उदा. डोळे, कान, नाक, सोंड कसे बनवायचे
रंग कसे द्यायचे
रंग कोणते वापरायचे
रंगकाम करताना घ्यावयाची दक्षता
आदी विषयांवर यात मार्गदर्शन होणार आहे.

अधिक माहिती, कॉल, व्हाट्सअप्पसाठी
अश्विनी शेटकार: +91 9834696424
विलास शेटकार: +91 8999417889

Review