केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीकडून 700 कोटींचा मदत...
केरळमधील महापुराच्या आपत्ती निवारणासाठी सर्वच स्तरातून मदत करण्यात येत आहे. केरळच्या मदतीसाठी देशासह जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) मोठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.
केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) तब्बल 700 कोटींचा मदत करण्यात आल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी दिली. तसेच, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केरळमधील महापूर, पुनर्वसन व पुनर्बांधणीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या 30 ऑगस्टला विशेष अधिवेशन घेण्याची शिफारस राज्यपाल यांच्याकडे करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी सांगितले.